Bhosari: प्रस्तावित वीज दरवाढीच्या विरोधात लघुउद्योजक संघटनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज – महावितरणने प्रस्तावित केलेली वीज दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड लघुउद्योगजक संघटनेने भोसरीतील महावितरणच्या विभागीय कार्यालायसमोर आंदोलन केले.

भोसरीतील महावितरणच्या विभागीय कार्यालायसमोर आज (मंगळवारी) झालेल्या आंदोलनात लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी लघुउद्योजक सहभागी झाले आहेत.

एमआयडीसी परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामळे उद्योगांचे कामाचे तास वाया जात आहेत. केबल बिघाडातून वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे भोसरी एमआयडीसीतील लघुउद्योजक हैराण झाले आहेत. वारंवार खंडीत होणा-या विजेच्या समस्या सोडविण्यात याव्यात, अशी संघटनेची मागणी आहे. त्यातच महावितरणने वीज दरवाढ प्रस्तावित केल्याने संघटना अधिकच आक्रमक झाली आहे.

भोसरी कार्यालयातील महावितरणचे कार्यकारी अभियंता एस.एल.शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.