Bhosari News: नगरसेविकेच्या सांगण्यावरून एकाला मारहाण करत हॉटेलमध्ये जबरी चोरी

पिंपरी-चिंचवड शहरातील एका युट्यूब चॅनलवर 'खंडणीखोर नगरसेविका' या मथळ्याखाली एक पोस्ट होती. ती पोस्ट फिर्यादी सरवदे यांनी 25 ऑगस्ट रोजी त्यांच्या फेसबुकवर टाकली.

एमपीसी न्यूज – नगरसेविकेच्या सांगण्यावरून तीन जणांनी मिळून एकाला मारहाण केली. तसेच हॉटेलमधून 3 हजार 120 रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेल्याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.

हा प्रकार 25 ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडला असून याबाबत 27 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश उर्फ गज्या भीमराव पवार (वय 30, रा. दिघी), सागर उर्फ सिद्धुधन शिवलिंग भोसले (वय 32, रा. भोसरी), विशाल भीमराव हाके (वय 30, रा. मोशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेंद्र लक्ष्मण सरवदे (वय 32, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील एका युट्यूब चॅनलवर ‘खंडणीखोर नगरसेविका’ या मथळ्याखाली एक पोस्ट होती. ती पोस्ट फिर्यादी सरवदे यांनी 25 ऑगस्ट रोजी त्यांच्या फेसबुकवर टाकली.

त्याचा राग मनात धरून नगरसेविका सीमा सावळे आणि सारंग कामटेकर यांच्या सांगण्यावरून आरोपी हे फिर्यादी यांच्या इंद्रायणीनगर येथील रॉयल फास्ट फूड या हॉटेलमध्ये आले. त्यांनी फिर्यादी यांच्या वडिलांना शिवीगाळ व मारहाण केली.

त्यानंतर जबरदस्तीने फिर्यादी यांच्या हॉटेलमधील 3 हजार 120 रुपयांची रोकड आरोपींनी चोरून नेली. आरोपींनी फिर्यादी यांनाही मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.