Chinchwad News : तीन दुचाकींसह सायकल, सायलेन्सर, लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – चिंचवड, निगडी, भोसरी परिसरातून तीन दुचाकी चोरीला गेल्या. देहूरोड मधून सायकल, भोसरी मधून इको गाडीचा सायलेन्सर आणि तळेगाव एमआयडीसी मधून दोन लॅपटॉप चोरून नेले आहेत. याप्रकरणी मंगळवारी (दि. 8) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सहा घटनांमध्ये एक लाख 27 हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे.

कृष्णा नंदकिशोर प्रजापती (वय 27, रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रजापती यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पावर हाऊस चौक, चिंचवड येथील एका दुकानासमोरून चोरून नेली. निलेश लहू पवार (वय 37, रा. प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पवार यांची 35 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराजवळून चोरून नेली. जहारसिंग रामदयाल रावत (वय 24, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रावत यांची 15 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरापासून चोरून नेली.

मंगेश प्रभाकरराव भटुरकर (वय 44, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये त्यांनी त्यांची 17 हजार रुपये किमतीची सायकल पार्क केली. मंगळवारी (दि. 8) दुपारी एक ते तीन वाजताच्या कालावधीत कुणाल सुभाषचंद्र वाल्मिकी (वय 27, रा. एमबी कॅम्प, देहूरोड) याने सायकल चोरून नेली. पोलिसांनी आरोपी कुणाल याला अटक केली आहे.

राजकुमारगेणू शेलार (वय 50, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या इको गाडीचा 10 हजार रुपये किमतीचा सायलेन्सर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. लिंबराज दत्तात्रय कदम (वय 32, रा. मोशी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवलाख उंब्रे येथील अग्रीबेन इंडिया प्रा ली या कंपनीतील लॉकर मधून 40 हजारांचे दोन लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.