Pune Accident News : कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

0

एमपीसी न्यूज : नवीन कात्रज बोगद्याजवळ मंगळवारी रात्री दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिस दाखल झाले आहेत. मयत व्यक्तींपैकी एकाची ओळख पटली आहे तर दुसऱ्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 

_MPC_DIR_MPU_II

अभिषेक किशोर कदम (25) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर जखमी झालेल्या एका तरुणाला भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तर 40 वर्षीय व्यक्ती देखील या अपघातात मृत्यू झाला आहे. पण, त्याची ओळख अद्याप तरी पटलेली नाही. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघे जण दुचाकीवरून जात होते. यावेळी कात्रज नवीन बोगद्याजवळ त्यांची  दुचाकी स्लिप झाली आणि हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती आहे. यात कदम यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनोळखी व्यक्तीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर धाबनगावे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment