Pimpri News : कोरोना प्रतिबंधक लसीची टंचाई; आज केवळ ‘ही’ 12 केंद्रे मर्यादित क्षमतेसह सुरू

एमपीसी न्यूज – बेड, ऑक्सिजन नंतर आता कोरोना प्रतिबंधक लसीचा मोठी टंचाई निर्माण झाली आहे.  लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील केवळ 12 लसीकरण केंद्रे आज (बुधवारी) मर्यादित क्षमतेसह सुरू राहणार आहेत. दुपारनंतर लसीचा साठा संपेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या 12 केंद्रांवर किती जणांचे लसीकरण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरात एकूण 100 पेक्षा जास्त ( महापालिका 60 आणि खासगी – 29 ) लसीकरण केंद्रामधून नागरिकांना लस देण्याचे काम सुरू होते. परंतु, लसीचा साठा कमी असल्याने केंद्रे बंद करावी लागली आहेत. केंद्रामध्ये घट होत चालली आहे. अनेक केंद्र लसीअभावी बंद आहेत. नागरिकांना लस मिळत नाही. लस न घेता परत जावे लागते. रांगेत थांबूनही लस मिळत नाही.

आजही लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने अनेक केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत.  लस उपलब्ध नसल्यामुळे आज मर्यादित क्षमतेसह 12 लसीकरण केंद्रे  कार्यरत असणार आहेत. या 12 केंद्रांवरच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.

ही लसीकरण केंद्रे आज सुरू राहणार!

पिंपळेगुरव येथील पीसीएमसी शाळा, यमुनानगर रूग्णालय,  स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, म्हेत्रेवस्ती दवाखाना, वायसीएम हॉस्पिटल, वाकड पीसीएमसी शाळा, तालेरा हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय,  सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन जिजामाता हॉस्पिटल पिंपरी, नवीन आकुर्डी रुग्णालय आणि दिव्यांसाठी चिंचवड, संभाजीनगर येथील रोटरी क्लब सेंटरमधील लसीकरण केंद्र सुरू राहणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.