Chakan Crime News : रस्ता ओलांडण्यासाठी महिलेला मदत करत असलेल्या तरुणाचा बसच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – एका महिलेला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करत असलेल्या तरुणाला भरधाव वेगात आलेल्या बसने धडक दिली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 30) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास बालाजीनगर, चाकण येथे घडला.

पवन भिवलाल कोळी (वय 23) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन छोटुराम पाटील (वय 21, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र मयत पवन हा मंगळवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर एका महिलेला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करत होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या बसने पवन यांना धडक दिली. यामध्ये पवन यांच्या छातीला, पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर आरोपी बस चालक घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या पवन यांचा या अपघातात मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.