Pune News : एमपीएससी परीक्षेच्यावेळी उमेदवाराकडे फोन, ब्ल्यूटूथ सापडला

एमपीसी न्यूज – शासकीय परीक्षेच्या वेळी होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून नेहमीच दक्षता घेतली जात असते. मात्र पुण्यात एमपीएससीच्या परीक्षे दरम्यान गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित उमेदवाराकडे फोन व ब्ल्यूटूथ हेडसेट सापडल्याने खळबळ उडाली आहे.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

एमपीएससीनं याबाबत व्टिट करुन माहिती दिली आहे. या व्टिटमध्ये म्हंटले आहे की, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा शनिवारी पार पडली. दरम्यान, परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली.

यामध्ये पुणे जिल्ह्याच्या नरे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेला मोबाईल फोन व ब्ल्यूटूथ इयर फोन इत्यादी साहीत्य सापडले. या उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.