Mutha River : मुठा नदीत पाच प्रवाशांसह वाहून गेली कार, कारमधील पाच जणांची थरारक सुटका

एमपीसी न्यूज : काही दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासापासून पुणे जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे धरणे तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. पुणे शहरातून जाणारी मोठा नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. गुरुवारी सायंकाळी शहरातील भिडे पूल देखील पाण्याखाली गेला होता. यावेळी नदीपात्रात असलेल्या अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यानंतर आता एस एम जोशी पुलाखालील (Mutha River) रस्त्यावरील एक थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. 
मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक कार मुठा नदीपात्रात वाहून जात असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रोप आणि लाईफ जॅकेटच्या मदतीने या वाहून जाणाऱ्या गाडीत अडकलेल्या पाच व्यक्तींची सुखरूप सुटका केली. सुटका करण्यात आलेली व्यक्ती हे मूळचे पालघर येथील आहे. ते पुण्यात एका नातेवाईकांकडे आले होते. नदीपात्रातील रस्त्याने ते जात असताना खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने त्यांची कार नदीत वाहून जात होती. वाहून जाणारी त्यांची कार गरवारे पुलाखाली अडकली होती. अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच त्यांनी गाडीत अडकलेल्या पाच जणांची सुखरूप सुटका केली.

Mutha River
गाडीत (Mutha River) अडकलेले वऺचिका लालवाणी (वय 13), प्रिया लालवाणी (वय 22), कुणाल लालवाणी (वय 28), कपिल लालवाणी (वय 21),  कृष्णा लालवाणी (वय 08) या व्यक्तीची सुखरूप सुटका केली. या कामगिरीमध्ये एरऺडवणा, जनता वसाहतच्या फायर गाड्या आणि सेऺट्रल फायर स्टेशनची रेस्क्यू व्हॅनची मदत झाली. ड्रायव्हर ज्ञानेश्वर खेडेकर, फायरमन किशोर बने, दिलीप घडशी, मदतनीस सऺदीप कार्ले यांनी ही कामगिरी पार पाडली.
https://youtu.be/y0uANT2Fsp4

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.