Chakan : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; टेम्पोचालक फरार

एमपीसी न्यूज – भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. दरम्यान, अपघाताची माहिती न देता टेम्पोचालक पळून गेला. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री पुणे-नाशिक महामार्गावर वाघेवस्ती, चाकण येथे घडली.

विशाल लक्ष्मण थिटे (वय 35, रा. थिटेवाडी, ता. खेड) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण तबाजी थिटे (वय 66) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एच 14 / सी पी 2275 या टेम्पो वरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री विशाल हे त्यांच्या मोपेड दुचाकीवरून (एम एच 14 / जी जी 1956) पुणे-नाशिक महामार्गावरून जात होते. चाकणजवळ वाघेवस्ती येथे आले असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एम एच 14 / सी पी 2275 या टेम्पोने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये विशाल यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती न देता आरोपी टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.