Chandrakant Patil : चंद्रकांत पाटीलच पुण्याचे पालकमंत्री ?

एमपीसी न्यूज – सत्ता स्थापन झाल्यानंतर मंगळवारी अखेर शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. दोन्ही गटातील प्रत्येकी 9 – 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता पुण्यातून मंत्रीपद मिळालेल्या चंद्रकांत पाटील यांना देखील संघी देण्यात आली. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र कॅबिनेट मंत्री पदानंतरही पुण्याचे पालकमंत्रीपद हे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडेच राहणार आहे अशी माहीती सूत्रांकडून मिळत आहे.

 

 

Vadgaon Maval – वडगावमध्ये हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ

 

मंत्रीमंडळ विस्तारापुर्वी पुण्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्विकारणार अशी चर्चा सुरु होती. आगामी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका व पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी स्वत: फडणवीस पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारणार अशी चर्चा सुरु होती.मात्र आजच्या विस्तारानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे येणार आहे, अशी खात्रीलायक माहीती सूत्रांकडून मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.