Pimpri Chinchwad traffick : गणपती विसर्जनाची मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad traffick) कार्यक्षेत्रात पाच, सात, आठ, नऊ दिवसाचे सार्वजनिक व घरगुती गणपती विसर्जनाची मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश वाहतूक विभागाने दिले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सध्या गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असून भव्य अशा गणपती विसर्जन मिरवणुका निघतात. या निवडणुकीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात भाग घेत आहेत.

5,7,8 व 9 दिवसाचे सार्वजनिक व घरगुती गणपती विसर्जनाचे मिरवणुकीकरिता नागरिक रस्त्यावर येत असल्याने गर्दी होत असते. या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी सुविण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे या दिवशी भातुकुंडी होऊ नये यासाठी पोलीस उप आयुक्त (वाहतूक पिंपरी चिंचवड) आनंद भोईटे यांनी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश दिलेले आहेत.

पिंपरी वाहतूक विभाग – Pimpri Chinchwad traffick

पिंपरी चौकातून शगुन चौकाकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल. ही वाहने पर्यायी मार्ग 1 म्हणजेच भाट नगर मार्गे इच्छित स्थळी जातील किंवा पर्याय मार्ग 2 वापरून मोरवाडी मार्गे एम्पायर स्टेटचे मदर टेरेसा ब्रिजवरून काळेवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील. काळेवाडी पुलावरून येणारी वाहने डीलक्स चौक, कराची चौकाकडे जाण्यास सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल. ही वाहने पर्यायी मार्गाने म्हणजेच काळेवाडी पुलावरून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडे महात्मा फुले कॉलेज, डेअरी फार्म मार्गे मुंबई- पुणे हायवे मार्गे इच्छित स्थळी जातील.

पिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल. ही वाहने पर्यायी मार्गाने म्हणजेच पिंपरी चौकाकडून पिंपरी सर्व्हिस रोडने पुमा शोरूम समोरून इच्छित स्थळी जातील. विभागाच्या हद्दीत गणपती विसर्जन व मिरवणूक असल्याने 4, 6, 8 व 9 सप्टेंबर रोजी दुपारी 4 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक वाढविण्यात येईल. यावेळेत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

हिंजवडी वाहतूक विभाग:

टाटा टी जंक्शन चौक – टाटा टी जंक्शन चौकाकडून जॉमेट्रिक सर्कल चौकाकडे वाहतूक जाण्यास प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाने म्हणजेच टाटा टी जंक्शन चौकाकडून जॉमेट्रिक सर्कल चौकाकडे जाणारी वाहतूक लक्ष्मी चौकाकडून इच्छित स्थळी जातील.

जॉमेट्रिक सर्कल चौकाकडून मेझा 9 व शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद असेल. ही वाहने पर्यायी मार्गाने म्हणजेच जॉमेट्री सर्कल चौकाकडून मेझा 9 व शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतूक टाटा टी जंक्शन चौकाकडे जाऊन लक्ष्मी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. मेझा 9 चौकाकडून शिवाजी चौककडे वाहतूक जाण्यास बंदी असेल. ही वाहने पर्यायी मार्गाने म्हणजेच मेझा 9 चौकाकडून शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतूक लक्ष्मी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

Badminton Competition : महाराष्ट्राच्या दर्शन, ताराचा उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

शिवाजी चौक (Pimpri Chinchwad traffick) : शिवाजी चौकाकडून जांभुळकर जीम, वाकड नाका, हिंजवडी गावठाणकडे वाहने जाण्यास बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाने विप्रो सर्कल फेज 1 चौक, जॉमेट्रिक, टाटा टी जंक्शन चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

कस्तुरी चौक: कस्तुरी चौकाकडून शिवाजी चौक हिंजवडीकडे वाहने जाण्यास बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाने म्हणजेच विनोदी वस्ती कॉर्नर लक्ष्मी चौक मार्गे जातील.

जांभूळकर जीम चौक: शिवाजी चौक व ताडीवाला रोडकडे वाहने जाण्यास बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाने म्हणजेच इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक पुढे विनोदी वस्ती कॉर्नर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

इंडियन ऑइल चौक येथून जांभुळकर जिम चौक व शिवाजी चौकाकडे वाहने जाण्यास बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाने म्हणजेच म्हणजेच कस्तुरी चौकाकडून विनोदी वस्ती कॉर्नर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत 9 सप्टेंबरला गणपती विसर्जन मिरवणूक असल्याने दुपारी 4 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वरीलप्रमाणे वाहतूक वळविण्यात येणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे वाहतूक विभागाने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.