Pimpri news : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरण, शिवप्रेमींचे आंदोलन

एमपीसी न्यूज : इंद्रायणीनगर व मोशी प्राधिकरण व भोसरी परिसरात भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विलास मडिगिरी व योगेश लांडगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी संचलन कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले असून त्यामध्ये जाणीवपूर्वक संघाचे हेगडेवार यांचा एक नंबर ला फोटो लाऊन त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो दोन नंबरला लावला.(Pimpri news) या फ्लेक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दुय्यम स्थान देण्यात आल्याने याचा निषेध म्हणून इंद्रायणीनगर मधील तिरुपती चौकात शिवप्रेमी व समविचारी पक्ष संघटना यांच्यावतीने आंदेलन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विलास मडिगेरी व योगेश लांडगे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करून समाज भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. वास्तविक पाहता शिवरायांची हिमालयापेक्षा उत्तुंग उंची असताना या फ्लेक्समध्ये ज्यांची योग्यता नाही अशा सोबत लावलेल्या फोटोचा आकार व उचित मान सन्मान न राखता छापण्यात आला आहे. त्यामुळे अशी निंदनीय कृती करणार्यांचा आंदोलन स्थळी घोषणाबाजी करून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वराज्य इंडियाचे मानव कांबळे यांनी निषेध केला.

FINNAPP : मृतात्म्यांना मतदारयादीतून ‘मुक्ती’ मिळवून देण्यासाठी सुचवला फंडा

तर माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कार्यक्रमाचा काहीही संबंध नसताना व छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारसरणी (Pimpri news) सर्व बहुजनांना सोबत घेऊन जाणारी असून ती एका विशिष्ट समाजाच्या पुरती व समाजात विषमता पेरणारी नसताना अशाप्रकारे युगपुरुषाच्या प्रतिमेची केलेली तुलना अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त करून निषेध व्यक्त केला.

या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतिश काळे काशिनाथ नखाते, प्रा.बी बी शिंदे, माजी नगरसेवक संजय वाबळे, निलेश मुटके, सुरज लांडगे, सिद्दीकी शेख नीरज कडू, सुनील साळुंके, श्रीकांत गोरे, प्रविण कदम यांच्यासह संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ यांच्यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.(Pimpri news) याप्रकरणी चौकशी करण्याकामी व तात्काळ गुन्हे नोंद करण्यासाठी तमाम शिवप्रेमींच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन पाठवले असल्याचे सतिश काळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.