Hinjawadi : ‘टुर्स’चे नियोजन करून देण्याच्या अामिषाने फसवणूक

एमपीसी न्यूज – दोन देशात जाण्यासाठी टुर्सचे नियोजन करून देतो, असे सांगून एका तरुणाची 3 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार हिंजवडी येथे नुकताच उघडकीस आला.

याप्रकरणी अंकुर अनिलकुमार जैन (वय 38, रा. बालाजी गार्डन, प्लॉट नं. 17, कोपरखैरणे, नवी मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर अशोक पाटील (रा. बावधन) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मयुर याने फिर्यादी अंकुर यांना दोन देशात जाण्यासाठी टुर्सचे सर्व नियोजन करून देतो, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी अंकुर याने मयुरला तीन लाख 20 हजार रुपये दिले. तथापि, पैसे घेऊनही सिंगापूर येथे टुर्ससाठी पाठविले नाही. तसेच पैसे देखील परत केले नाहीत.  त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अंकूर यांनी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. हिंजवडी ठाण्याचे फौजदार डी. एन. निकम तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.