Chicnhwad News : शहरात राष्ट्रवादीची परिस्थिती पूर्ववत होईल – शरद पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील सत्ता बदलासंबंधी (Chicnhwad News) अलिकडच्या काळात सर्वसामान्य लोकांमध्ये अनुकूल अशी प्रतिक्रिया येत नाही. निवृत्त झालेल्या काही वरिष्ठ अधिका-यांनी वर्षा, दीड वर्षापूर्वी मला सांगितले होते, की या ठिकाणी शहराचे वाटप झाले आहे. विकासापेक्षा अर्थकारणाला महत्त्व वाढले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये बदलाला संधी आहे. शहरात राष्ट्रवादीचे चित्र पूर्ववत होईल याची मला खात्री आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. आगामी काळात होणा-या सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात परिवर्तन दिसेल अशी माझी खात्री आहे, असेही ते म्हणाले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी पवार आज चिंचवडमध्ये आले होते. पिंपळेसौदागर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार निलेश लंके, अतुल बेनके, अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले उपस्थित होते.

Chinchwad News : पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली – शरद पवार

शदर पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये अलीकड्च्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि (Chicnhwad News) आमच्या अन्य सहका-यांना हवे तसे यश मिळाले नाही. एक काळ असा होता महापालिका, अन्य संस्थामध्ये जनतेचा पाठिंबा आम्हा लोकांना होता. मधल्या काळात दोन निवडणुकीत एक वेगळे चित्र या ठिकाणी दिसले. बदल झाला. पण, अलिकडच्या काळात या बदलासंबंधी सर्वसामान्य लोकांमध्ये अनुकूल अशी प्रतिक्रिया येत नाही.

निवृत्त झालेल्या काही वरिष्ठ अधिका-यांनी वर्षा, दीड वर्षापूर्वी सांगितले होते, की या ठिकाणी शहराचे वाटप झाले आहे. विकासापेक्षा अर्थकारणाला महत्त्व वाढले आहे. त्यामुळे साहजिकच आमची सत्ता असो किंवा नसो निदान संघटनेची बांधणी महाविकास आघाडी म्हणून करु शकलो. विकासाला गती देणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडचा लौकिक होता. तो पुन्हा प्रस्थापित करण्याची भूमिका आम्ही सर्वांनी स्वीकारली आहे.

शहराच्या विकासात आमच्या पक्षाचा हातभार मोठा होता ही गोष्ट नाकारु शकत नाही. मागच्यावेळेला आम्हाला बाजूला केले. लोकशाहीमध्ये जे लोक सत्तेवर बसवतात ते लोक सत्तेपासून बाजूलाही काढतात. सत्तेवर बसविल्यावर पाय जमिनीवर ठेवून चालावे लागते. ते हवेत ठेवून चालत नाही. आणि बाजुला केले म्हणून नाऊमेद होवून चालत नाही. पुन्हा एकदा स्थान प्रस्थापित करावे लागते. आमचे सहकारी तसे काम करत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे चित्र पूर्ववत होईल याची मला खात्री आहे, असा शरद पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.