Pune News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार होते पण…, अमित शाह यांचा पुण्यात खुलासा

एमपीसी न्यूज : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मी महाराष्ट्रात आलो होतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे मी शिवसेनेसोबत बोललो होतो. परंतु निवडणुकीनंतर शिवसेना पलटली. मी खोटं बोलतो म्हणतात, ठीक आहे ते मान्य आहे. पण तुमच्या सभेत फोटो कोणाचे मोठे होते.

मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही खोटं बोललात अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. अमित शाह पुण्यातील भाजप बुथ कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते.

अमित शाह म्हणाले, महाराष्ट्रातील सध्याचे सरकार तीन चाकी रिक्षा सारखे आहे. ही रिक्षा बंद पडली तर चाकातली हवा नाही. या सरकारच्या हातात हे राज्य कसं चालेल. माझं या सरकारला आव्हान आहे राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. बघा मग अवस्था काय होते अशा शब्दात अमित शाह यांनी शिवसेनेला आव्हान दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलच्या किमती कमी केल्या.

या उलट उद्धव ठाकरे सरकारने दारू च्या किमती स्वस्त केल्या. उद्धव ठाकरे तुम्ही उत्तर द्या असे म्हणत अमित शाह यांनी महा विकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.