Chikhali : ओएलएक्सवर कार विकण्याच्या बहाण्याने महिलेची चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ओएलएक्सवरून कार विकण्याच्या बहाण्याने एका महिलेकडून सुमारे 3 लाख 96 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन कार न देता महिला ग्राहकाची फसवणूक केली. हा प्रकार 1 ते 11 मे 2019 या कालावधीत घडला.

_MPC_DIR_MPU_II

स्नेहल प्रशांत वाले (वय 32, रा. चिंचवड प्राधिकरण) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोबाईल क्रमांक 9001037849, 7438087214 आणि पेटीएम खातेधारक 917438087320, 9785517985, 919671853683 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांची एमएच 12 / पीझेड 1210 ही कार ओएलएक्सवर विकण्यासाठी जाहिरात दिली. स्नेहल यांनी याबाबत आरोपींशी संपर्क केला. आरोपींनी स्नेहल यांच्याकडून वेळोवेळी तीन पेटीएम खात्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी सुमारे 3 लाख 96 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन कार न दिल्याने स्नेहन यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.