Chikhali : निलेश नेवाळे यांच्या कार्यातून दातृत्वभाव आणि समाजाप्रती कनवळा दिसतो; आमदार महेश लांडगे यांचे गौरवोद्गार

हास्यजत्रा कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद; भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची उपस्थिती

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यासाठी निलेश नेवाळे (Chikhali ) यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यांच्या कार्यामुळे परिसरात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. व्यवसाय क्षेत्रातही त्यांचे मोठे नाव आहे. नेवाळे यांच्या कार्यातून दातृत्वभाव आणि समाजाप्रती कनवळा दिसतो, असे गौरवोद्गार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी काढले.

चिखली पूर्णानगर शनिमंदिर येथील मैदानावर आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाराष्ट्राचे हास्यवीर या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हास्यजत्रा फेम गौरव मोरे, प्रशांत खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब यांनी हास्याचे फवारे उडवत मनोरंजन केले. परिसरातील हजारो अबाल वृद्धांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, महिला अध्यक्षा सुजाता पालांडे, कामगार नेते विष्णुपंत नेवाळे, माजी नगरसेवक नारायण बहिरवडे, सुजित पाटील, कार्तिक लांडगे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, कविता हिंगे, सोनम मोरे, गौरी नेवाळे, प्रिया नेवाळे, श्रेया नेवाळे आदी उपस्थित होते.

Congress : कॉंग्रेसची कार्यकारिणी जाहीर; ‘यांची’ लागली वर्णी

चिखली परिसरात नीलेश नेवाळे यांचे मोठे कार्य आहे. कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. सुख दुख:मध्ये (Chikhali ) आपल्या कुटुंबातील व्यक्तीला आपली काळजी असते, सर्व बाबतीत चिंता असते. तशीच काळजी नीलेश नेवाळे यांनी कोरोना काळात लोकांची घेतली.अन्नधान्य, वैद्यकीय मदत, घरपोच देण्याचे कार्य त्यांनी केले असे सांगत आमदार महेश लांडगे म्हणाले, भोसरी परिसरात कामगार, कष्टकरी वर्गासह सर्व सामाजिक स्थरातील लोक वास्तव्यास आहेत. त्यांचा विकास करणे, गरजा, अपेक्षा पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडत आहोत. माझ्या संघर्षाच्या काळात जे माझा आधार होते, त्यापैकी एक विष्णुपंत नेवाळे हे आहेत, असेही ते म्हणाले.

महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे पोस्टर्स अयोध्यानगरीत झळकले!

चित्रा वाघ म्हणाल्या, महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून साकारलेला वेस्ट टू एनर्जी प्रकल्प हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे शहरातील कच-याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच संतपीठ हे देखील महाराष्ट्रातील पहिलेच संतपीठ आहे. बैलगाडा शर्यतीसाठी लांडगे यांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या वाढदिवसाचे पोस्टर्स अयोध्यानगरीत झळकले असून ते केवळ पिंपरी-चिंचवड पुरते मार्यादीत नसून अयोध्यापर्यंत त्यांची ख्याती आहे.

येत्या जानेवारीमध्ये ते 5 हजार लोकांना अयोध्येचे दर्शन घडवणार असून असे करणारे ते महाराष्ट्रातले पहिलेच आमदार आहेत. जेव्हा राज्यात शाहिस्तेखान व औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्यात येत होते, तेव्हा त्या विरोधात महेश लांडगे यांनी विधानसभेत आवाज उठवला. ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारे आहेत. इंद्रायणी थडीसारखे उपक्रम ते राबवित आहेत.

जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आमदार महेशदादा!

निलेश नेवाळे म्हणाले, आपल्या कर्तुत्व आणि दातृत्वाने लोकांच्या, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आमदार म्हणजे महेशदादा लांडगे आहेत. त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना व्हिजन 2020 च्या माध्यमातून दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. त्यांना जनतेनी महापालिकेत कारभारी म्हणून कौल दिला. त्यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यांच्यामुळेच समाविष्ट गावातील पाण्याचा प्रश्न सुटला, सर्वांगीण विकास झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.