Chikhali : पतीचे अनैतिक संबंध उघड आणल्याने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ

एमपीसी न्यूज : पत्नीशी (Chikhali) अनैसर्गिक संभोग, मानसिक व शारीरिक छळ व मारहाण करणाऱ्या पतीस चिखली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात काल फिर्यादी दिली आहे.

हेमंत पाटील (रा. चिखली) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपी फिर्यादी सोबत अनैसर्गिक शरीर संबंध करत असत. तसेच, फिर्यादीच्या चरित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण करत. आरोपीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध होते. फिर्यादी यांनी या गोष्टी सर्वांसमोर उघड केल्या म्हणून त्यांच्या पतीने राग मनात धरून कोणाला काही सांगितल्यास तुला बघून घेईन अशी धमकी दिली. त्यानंतर ते नेहमी चिडून वाईट बोलून मारहाण करून फिर्यादी यांचा मानसिक व शारीरिक छळ करू लागले व फिर्यादी यांना घरातून हाकलून दिले.

Ravet : रावेतमध्ये 98 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस; गुन्हा दाखल

फिर्यादी यांना कोणीतरी (Chikhali) अनोळखी इसम भेटण्यासाठी आला होता, असे छुप्या कॅमेऱ्यामध्ये त्याचा विडिओ रेकॉर्ड करून तो फिर्यादी यांच्या भावास मोबाईलवर पाठवून फिर्यादी यांची बदनामी केली. या घटना 20 फेब्रुवारी 2009 ते 13 ऑक्टोबर 2021 पर्यंत तळवडे, चिखली आणि त्यांच्या गावी घडल्या. आरोपी विरोधात भा. द. वि. कलम 376, 377, 498(अ), 323, 504, 506, 500 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.