Ravet : रावेतमध्ये 98 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वीजमीटरमध्ये (Ravet) फेरफार करून बांधकामासाठी सुरु असलेली 2 लाख 4 हजार 292 युनिटची म्हणजे 98 लाख 8 हजार 440 रुपयांची वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकाने नुकतीच उघडकीस आणली आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

याबाबत माहिती अशी की, रावेत येथील रवी खिलुमन ओछानी या ग्राहकाकडील वीजमीटर व संचाची महावितरणच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये वीजमीटरमध्ये रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फेरफार करून इमारतीच्या बांधकामासाठी गेल्या 18 महिन्यांमध्ये 2 लाख 4 हजार 292 युनिटची म्हणजे 98 लाख 8 हजार 440 रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. याप्रकरणी रवी खिलुमन ओछानी विरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 मधील कलम 135, 136, 137 व 138  नुसार रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Snake Bite : पुणे जिल्ह्यात 20 वर्षीय विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू

वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी (Ravet) सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता अनिल कुराडे, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी शुभांगी पतंगे व सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.