गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Chinchwad : मतमोजणीच्या दिवशी पावणेतीनशे जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – मतमोजणीच्या दिवशी शहरात शांतता राहावी, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस सज्ज होते. मतमोजणीच्या दिवशी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 272 जणांना ताब्यात घेतले. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 56 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया सोमवारी (दि. 21) पार पडली. मतदानाच्या दिवशी पिंपरी गावात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ राडा झाला. यामध्ये पिंपरी पोलिसांनी माजी उपमहापौरांसह पाच जणांना अटक केली. तसेच पिंपरी येथे एका मतदान केंद्रासमोर जमावबंदीचे उल्लंघन केल्यावरून 21 जणांना अटक करण्यात आली. मतमोजणीच्या दिवशी शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सज्ज झाले होते. त्यासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

मतदानाच्या दिवशी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 14 पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 272 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाणे आणि ताब्यात घेतलेल्यांची संख्या –

वाकड – 15
हिंजवडी – 13
चिंचवड – 13
पिंपरी – 56
एमआयडीसी भोसरी – 21
भोसरी – 17
चिखली – 11
निगडी – 20
सांगवी – 10
तळेगाव – 42
देहूरोड – 11
दिघी – 31
आळंदी – 12

Latest news
Related news