Chinchwad : एमआयडीसी, भोसरी, चाकण, देहूरोडमधून ट्रकसह चार वाहने चोरीला

Four vehicles including a truck were stolen from MIDC, Bhosari, Chakan, Dehu Road

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात एमआयडीसी भोसरी, भोसरी, चाकण आणि देहूरोड परिसरातून चार वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये एक ट्रक आणि तीन दुचाकींचा समावेश आहे. याबाबत मंगळवारी (दि. 9) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

एमआयडीसी, भोसरी येथे सार्वजनिक रस्त्यावर उभा केलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 15 मे रोजी उघडकीस आली.

अनिकेत बाळू सोमवंशी (वय 21, रा. गोल्डन पाम्स सोसायटी, मोशी) यांनी मंगळवारी (दि. 9) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवंशी यांनी त्यांचा चार लाख रुपये किंमतीचा ट्रक (एमएच 14 / बीजे 3247) 18 मे रोजी एमआयडीसी भोसरी येथील गणेश प्रेसिजन वर्क कंपनीसमोर पार्क केला होता.

25 मे रोजी हा ट्रक चोरीला गेल्याचे उघडकीस आले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

वाहनचोरीची दुसरी घटना पीएमटी चौक, भोसरी येथे 4 मे रोजी घडली. याबाबत राहूल काशिनाथ दासरे (वय 40, रा. गुरुनानक कॉलनी, केशवनगर, कासारवाडी) यांनी मंगळवारी (दि. 9) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दासरे यांनी 4 जून रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास आपली 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच 14 / एपी 5207) पीएमटी चौक येथील शिवाजी पुतळ्याच्या समोर उभी केली होती.

सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीची तिसरी घटना चाकण बस स्टॅन्डच्या पाठीमागे 8 जून रोजी घडली. बारखु सखाराम साकोरे (वय 52, रा. मोई, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साकोरे यांनी 8 जून रोजी दुपारी दोन वाजता त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / एचएन 9493) चाकण येथील बस स्टॅन्डच्या पाठीमागे अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

हा प्रकार दुपारी चार वाजता उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीची चौथी घटना विठ्ठलवाडी देहूगाव येथे घडली. काना गंदला मैस्यया चिरंजीव (वय 32, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चिरंजीव यांनी 18 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / बीक्यू 8816) देहूगाव येथील विठ्ठलवाडी येथे पार्क केली होती.

अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 20 मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता उघडकीस आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.