Chinchwad News: एमएससी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत त्रुटी, अभाविपचे आंदोलन 

एमपीसी न्यूज – ‘एमएससी’चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत त्रुटी आढळल्याने, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज (दि.02) चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात आंदोलन करण्यात आले. महाविद्यालयाने विद्यापीठाला गुण न पाठविल्याने गुणपत्रिकेवर चुकीचा शेरा आला असा आरोप विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आला. तर, विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका दिली जाईल, असे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

आंदोलनाबाबत माहिती देताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नगरमंत्री ऋत्विक देशपांडे म्हणाले, एमएससी विद्यार्थ्यांच्या तिसऱ्या सत्राचे गुण महाविद्यालयाने विद्यापीठाला न पाठविल्याने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित असा शेरा आला आहे. महाविद्यालयाच्या चुकीमुळे 90 विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला असल्याचे देशपांडे म्हणाले.

याबाबत स्पष्टीकरण देताना कमला एज्युकेशन सोसायटीचे सचिव दीपक शहा म्हणाले, ‘कोरोना काळात सर्व शैक्षणिक कामं ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाला पाठविण्यात आले होते. पण तांत्रिक चुकीमुळे गुणपत्रिकेवर स्टार मार्क आला आहे.‌ ज्याचा अर्थ परिक्षार्थी अनुपस्थित आहे असा होतो. हा स्टार मार्क हटविण्यासाठी आम्ही विद्यापीठाच्या संपर्कात आहोत. हा मार्क काढून विद्यार्थ्यांना नवीन गुणपत्रिका दिली जाईल.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.