Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट; शहरातून चार दुचाकींसह टेम्पो पळविला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहने चोरली जात आहेत. गुरुवारी (दि. 5) पिंपरी, दिघी, वाकड, देहूरोड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे तर हिंजवडी पोलीस ठाण्यात टेम्पो चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सततच्या होणा-या वाहन चोरीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

प्रवीण तात्याराव नाईक (वय 32, रा. कैलासनगर, थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 30 नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात ते सव्वादहाच्या सुमारास प्रवीण यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / एफ ए 4648) वल्लभनगर एसटी स्टॅन्डसमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

मारुती बाळासाहेब झंझणे (वय 43, रा. मोशी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 26 नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास इंद्रायणी घाट आळंदी येथे त्यांची एम एच 14 / डी झेड 6602 ही मोटारसायक पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पूनम अमित फडतरे (वय 33, रा. काळेवाडी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि. 2) सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ या कालावधीत पूनम यांच्या घराच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / जी के 8806) चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

आशिष विजय चंदर (वय 29, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि. 3) सकाळी सात ते बुधवारी (दि. 4) सकाळी सात या कालावधीत आशिष यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची एम एच 31 / डी आर 3071 ही दुचाकी घरासमोरील मोकळ्या जागेत पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

अशोक धोंडीराम धनवडे (वय 54, रा. शिंदेवस्ती, मारुंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि. 4) रात्री आठ ते गुरुवारी (दि. 5) सकाळी साडेसात या वेळेत आशिष यांनी त्यांचा एम एच 14 / ए एस 5804 हा टाटा कंपनीचा 207 डी आय टेम्पो भूमकर चौकातील पूना बेकरीजवळ पार्क केला. अज्ञात चोरट्यांनी बनावट चवीच्या साहाय्याने टेम्पो चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.