Pune News : शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांना चोरट्यांचा हिसका, वाचा नेमकं काय घडलं? 

एमपीसी न्यूज : पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांना चोरट्याने चांगलाच हिसका दाखवला. बनावट चावीने त्यांच्या कारचा दरवाजा उघडून त्यांचे रिवाल्वर चोरून नेले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बागवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडक पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंज पेठेतील लोहियानगर ते भवानी पेठेतील अरुणकुमार वैद्य स्टेडियम या दरम्यान हा प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रमेश बागवे यांनी आपल्या कारच्या ड्रायव्हर शेजारी असणाऱ्या सिटच्या पाठीमागे कप्प्यात ही रिवाल्वर ठेवले होते. हि चोरी नेमकी कशी झाली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. अज्ञात चोरट्याने कारचा दरवाजा उघडून किंवा कार ची बनावट चावी तयार करून हे रिवाल्वर चोरून गेले असावे अशी शक्यता आहे. खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.