Pimpri News : लस न घेणा-यांनी पुढच्या दहा दिवसांत लस घ्यावी; आयुक्त राजेश पाटील यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – ‘कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. शहरात ओमायक्रॉन बाधितांची देखील संख्या वाढत आहे. कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी आत्ताच खबरदारी घ्यावी लागणार आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा पेक्षा घातक आहे. शहरात अद्याप लसीचा पहिला तसेच दुसरा डोस न घेणा-यांची संख्या अधिक, त्यामुळे लस न घेणा-यांनी पुढच्या दहा दिवसांत लस घ्यावी,’ असे आवाहन पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आवाहन केले.

आयुक्त राजेश पाटील यांनी आज (शुक्रवारी, 07) कोरोना, ओमायक्रॉन आणि लसीकरण या विषयावर शहरवासी यांसोबत फेसबुकद्वारे ‘जनसंवाद’ केला.

यावेळी आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ‘नव्याने आलेला ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा पेक्षा घातक आहे. त्याची संसर्ग क्षमता 30 पट अधिक आहे. अशात अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. शहरात आजही एक ते दिड लाख नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही तसेच जवळपास दोन लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतला नाही.

आता संसर्ग झालेल्या रूग्णांमध्ये 82 टक्के नागरिकांनी एकही डोस घेतलेला नाही त्यामुळे कोरोनाच्या लाटेपासून बचावासाठी लस न घेणा-यांनी पुढच्या दहा दिवसांत पालिकेच्या लसीकरण केंद्रावर लस घ्यावी तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना नेहमी मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे या सवयी कायम ठेवाव्यात असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी शहरवासियांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.