Pimpri Smart City News: तांत्रिक मान्यतेबाबत शासनाचा अभिप्राय घेणार –  आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटीतील आक्षेपांची मी शहानिशा केली. मला त्यात काही आढळले नाही. खोदाईच्या कामाची चौकशी केली जाईल. स्मार्ट सिटीतील एल अन्ड टी च्या 250 कोटी रुपयांच्या कामाला तांत्रिक मान्यतेची गरज आहे की नाही? याबाबत राज्य शासनाचा अभिप्राय घेण्यात येणार असल्याचे, स्मार्ट सिटीचे सीईओ असलेले महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

स्मार्ट सिटीतील एल अन्ड टी च्या सुमारे 250 कोटी रुपयांच्या कामाला तांत्रिक मान्यताच (टेक्निकल सॅक्शन) नसल्याचे उघडकीस आल्याने नगरसेवकांकडून प्रशासनावर हल्लाबोल केला जात आहे. ‘आयटीचे’ काम असून त्याला तांत्रिक मान्यतेची गरज नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. तर,आयटीचे काम थोडे होते. 148 कोटीचे काम सिव्हीलचे होते. त्यामुळे त्यासाठी तांत्रिक मान्यतेची आवश्यकता असल्याचे नगरसेवकांकडून सांगितले जाते.

त्याबाबत पत्रकारांशी बोलताना आयुक्त पाटील म्हणाले, तांत्रिक मान्यता न घेतल्याने काही नुकसान झाले आहे का याचीही तपासणी केली जाईल. स्मार्ट सिटीच्या कामासाठी सब ठेकेदार नेमला आणि कळविले नाही, अशा लोकांवर कारवाई केली आहे. चुकीचे आढळल्यास कारवाई करणार, कोणाची हयगय केली जाणार नाही. स्मार्ट सिटीच्या निविदा निघताना मी नव्हतो.

महापालिकेत दररोज 70 ते 80 निविदा निघतात. वैद्यकीय विभागाने महापालिकेच्या विविध रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याबाबतच्या एका संस्थेची कागदपत्रे बोगस असतील. तर, त्याची चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाईल.

पिंपरी-चिंचवडकरांसाठी डिसेंबरपासून आंद्रा-भामा आसखेड धरणातून दररोज 100 एमएलपी पाणी उचलण्यात येणार आहे. 24 बाय 7 ही सुरु करत आहोत. टप्प्या-टप्प्याने दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असेही आयुक्त पाटील यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.