Vadgaon Maval News : स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा सामुदायिक विवाह सोहळा होणार 24 एप्रिलला

समितीच्या अध्यक्षपदी सुनील शिंदे

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळा समिती आयोजित सामुदायिक विवाह सोहळा 24 एप्रिल रोजी होणार आहे. नुकतीच प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या अध्यक्षपदी सुनील शिंदे यांची तर कार्यक्रमप्रमुखपदी अर्जुन ढोरे यांची निवड करण्यात आली  तसेच समितीची नवीन कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी राजेंद्र वहिले, विलास दंडेल, अरुण वाघमारे,विवेक गुरव,अतुल राऊत, गणेश विनोदे,अनिल कोद्रे, शंकर ढोरे, रोहिदास गराडे, काशिनाथ भालेराव, मंगेश खैरे, अजय धडवले, महेश तुमकर, विनय लवंगारे, गणेश झरेकर, अक्षय बेल्हेकर, संतोष निघोजकर, प्रथमेश घाग, कार्तिक यादव उपस्थित होते.

गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे सामुदायिक विवाह सोहळा होऊ शकला नाही, तसेच महागाईमुळे अडचणीत आलेले सर्वसामान्य नागरिक व सध्या पुन्हा सुरू झालेला लग्नाचा डामडौल या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कुटुंबांना आधार मिळावा या उद्देशाने यावर्षी विवाह सोहळा करण्याचे निश्चित करण्यात आले.

यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा हा दि.२४ एप्रिल रोजी संपन्न होणार असून नियोजित जोडप्यांना संपूर्ण पोशाख, संसारपयोगी भांडी, वऱ्हाडी मंडळींची जेवणाची व्यवस्था, नवरदेवांची मिरवणूक आदींसह विवाह सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष – सुनील शिंदे, कार्यक्रमप्रमुख – अर्जुन ढोरे, उपाध्यक्ष – सदाशिव गाडे, सोमनाथ धोंगडे, सचिव – शरद ढोरे, सहसचिव – संजय दंडेल, खजिनदार – अनिल कोद्रे, सहखजिनदार – सुनिल दंडेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.