Chakan News : कंटेनर आणि ट्रकची धडक, कंटेनर चालकाचा मृत्यू  

एमपीसी न्यूज – कंटेनर आणि ट्रकची समोरा समोर धडक होऊन मोठा अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आहे. चाकण शिक्रापूर रोडवर, ब्लु डायमंड हॉटेल, बहुळ येथे शनिवारी (दि.19) पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. 

कमलेश कुमार यादव (वय 25, रा. दरबारी कला मिर्झापूर, उत्तर प्रदेश) असे अपघातात मयत झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.

शिवशंकर हरीराम यादव (वय 30, रा. वडगाव बुद्रुक, मुळगाव रा. दरबारी कला मिर्झापूर, उत्तर प्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा अशोक खेडकर (वय 26, रा. शिरुर, पुणे) या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश सुतार आपला कंटेनर (MH 46 AF 0810) मधून जात होते. त्यावेळी आरोपी कृष्णा समोरुन ट्रक (MH 12 MV 6787) भरधाव वेगाने घेऊन आला व कंटेनरला समोरुन धडक दिली. या अपघातात कंटेनर चालक कमलेश गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित करण्यात आले. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.