Talegaon Dabhade News : नूतन कॅम्पसमध्ये कोरोना लसीकरण शिबीर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाचा  उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र  इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी आणि नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्चमध्ये कोवीड -19 लसीकरण मोहीम राबविण्यात आली. 

महाराष्ट्र शासनाची  मिशन युवा  स्वास्थ्य  ही लसीकरण मोहीम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी  राबविण्यात आली. शिबिराचे उदघाटन संस्थेचे खजिनदार राजेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एनसीईआरचे प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर आणि विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

अनेक विद्यार्थ्यांनी शिबिरातील लसीकरणाचा लाभ घेतला. राज्य शासनाने शाळा महाविदयालये सुरु करण्यास परवानगी दिली आहे. दीड वर्ष ऑनलाईन शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी आता प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेत आहेत. कोरोना साथीचा प्रादुर्भाव आटोक्यात यावा यासाठी शासन स्तरावर वेळोवेळी प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून नूतन कॅम्पसमध्ये कोरोना प्रतिबंध लसीकरण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा संस्थेचा मानस आहे. उपलब्ध आकडेवारी नुसार अंदाजे 80 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले असल्याचे नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा यांनी सांगितले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार आदी मान्यवरांनी या उपक्रमास  शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संयोजन रवी दाभाडे, प्रदीप शिंदे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.