Corona World Update: 24 तासांत सर्वाधिक 4 लाख 90 हजार नव्या रुग्णांची भर, सक्रिय रुग्णांची संख्या एक कोटीच्या उंबरठ्यावर

कोरोनामुक्तांचे प्रमाण 73.96 टक्के, मृत्यूदर 2.7 टक्क्यांपर्यंत खाली, 99.23 टक्के रुग्णांना कोरोनाची सौम्य लागण

एमपीसी न्यूज –  जगभरात काल (शुक्रवारी) तब्बल 4 लाख 90 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. एका दिवसांत नवीन कोरोना रुग्णांची नोंद होण्याचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या सव्वाचार कोटींच्या घरात पोहचली आहे. आतापर्यंत 3 कोटी 14 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

जगातील कोरोनाचा मृत्यूदर सातत्याने थोडा-थोडा कमी होत 2.70 टक्क्यांपर्यंत खाली आला असला तरी नवीन कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने कोरोनामुक्तांचे प्रमाण मात्र आता थोडे घसरताना तर सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण थोडे वाढताना दिसत आहे. सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढून 23.34 टक्के झाले आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 4 कोटी 24 लाख 88 हजार 887 झाली असून आतापर्यंत एकूण 11 लाख 49 हजार 229 (2.70 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 24 हजार 532 (73.96 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगात आता कोरोनाचे 99 लाख 15 हजार 126 (23.34 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 98 लाख 38 हजार 590 (99.23 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 76 हजार 536 (0.77 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

मागील चार दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

20 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 83 हजार 202, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 70 हजार 914, मृत्यू 6 हजार 169

21 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 37 हजार 441, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 84 हजार 881, मृत्यू 6 हजार 855

22 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 78 हजार 132, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 73 हजार 730, मृत्यू 6 हजार 470

23 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 90 हजार 059, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 40 हजार 199,  मृत्यू 6 हजार 531

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.