Corona World Update: एकूण 92 लाखांपैकी 49 लाखांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात, 53.56 टक्के कोरोनामुक्त!

Corona World Update: Out of a total of 92 lakh, more than 49 lakh patients overcome corona, 53.56 per cent corona free! कोरोना बळींचा आकडा 4.73 लाखांवर तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 38 लाखांच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज – जगात काल (सोमवारी) एका दिवसात 1 लाख 38 हजार 975 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 82 हजार 775 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे. जगातील  कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 92 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचला असला तरी त्यापैकी 49 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी आणखी वाढून 53.56 टक्के झाली आहे. जगातील मृतांची एकूण टक्केवारी 5.16 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 41.29 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही दिलासादायक बाब आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 91 लाख 80 हजार 875 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 73 हजार484 (5.16 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 49 लाख 16 हजार 914 (53.56 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 37 लाख 90 हजार 477 (41.29 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 37 लाख 17 हजार 227 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 57 हजार 888 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

16 जून – नवे रुग्ण 1 लाख 42 हजार 557,  कोरोनामुक्त 1 लाख 05 हजार 806 , मृतांची संख्या 6 हजार 592

17 जून – नवे रुग्ण 1 लाख 41 हजार 872 ,  कोरोनामुक्त 1 लाख 08 हजार 580, मृतांची संख्या 5 हजार 264

18 जून – नवे रुग्ण 1 लाख 40 हजार 528 ,  कोरोनामुक्त 96 हजार 845 , मृतांची संख्या 5 हजार 123

19 जून – नवे रुग्ण 1 लाख 81 हजार 005 ,  कोरोनामुक्त 1 लाख 10 हजार 910 , मृतांची संख्या 5 हजार 066

20 जून – नवे रुग्ण 1 लाख 56 हजार 923 ,  कोरोनामुक्त 1 लाख 12 हजार 990 , मृतांची संख्या 4 हजार 428

21 जून – नवे रुग्ण 1 लाख 30 हजार 254 ,  कोरोनामुक्त 1 लाख 685 , मृतांची संख्या 3 हजार 338

22 जून – नवे रुग्ण 1 लाख 38 हजार 975 , कोरोनामुक्त 82 हजार 775 , मृतांची संख्या 3 हजार 880

अमेरिकेत 10 लाखांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (सोमवारी) 31 हजार 496 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 23 लाख 88 हजार 153 झाली आहे. सोमवारी 363 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1 लाख 22 हजार 610 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 10 लाख 02 हजार 929 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजून 12 लाख 62 हजार 614 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 11 लाखांवर

ब्राझीलमध्ये सोमवारी 748 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 51 हजार 407 वर जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 11 लाख 11 हजार 348 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 5 लाख 79 हजार 226 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 80 हजार 715 आहे.

मेक्सिकोत सर्वाधिक 1,044 कोरोना बळी

मेक्सिकोत सोमवारी एका दिवसात 1044 कोरोना बळींची नोंद झाली आहे. जगातील सर्व देशांमध्ये हा आकडा सर्वाधिक आहे. भारतात सोमवारी 312 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. पेरूमध्ये 178, इराणमध्ये 119, रशियात 95, पाकिस्तानमध्ये 89, इजिप्तमध्ये 85,  कोलंबियात 73, स्वीडनमध्ये 69, दक्षिण अप्रिकेत 61 बळी गेले आहेत.

जागतिक क्रमवारीत सौदी अरेबिया 15 व्या स्थानावर

सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत सौदी अरेबियाने फ्रान्सला मागे टाकत 15 वे स्थान मिळविले आहे. दक्षिण अफ्रिकेने सोमवारी कोरोनाबाधितांचा एक लाखांचा टप्पा ओलांडला. आता जगात एक लाखपेक्षा अधिक कोरोनाबाधित असलेल्या देशांची संख्या 19 झाली आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 23,88,153 (+31,496), मृत 122,610 (+363)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 11,11,348 (+24,358), मृत 51,407 (+748)
  3. रशिया – कोरोनाबाधित 5,92,280 (+7,600), मृत 8,206 (+95)
  4. भारत – कोरोनाबाधित 4,40,450 (+13,540) , मृत 14,015 (+312)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 305,289 (+958), मृत 42,647 (+15)
  6. स्पेन – कोरोनाबाधित 2,93,584 (+232), मृत 28,324 (+1)
  7. पेरू –  कोरोनाबाधित 2,57,447 (+2,511) , मृत 8,223 (+178)
  8. चिली – कोरोनाबाधित 2,46,963 (+4,608), मृत 4,502 (+23)
  9. इटली – कोरोनाबाधित 2,38,720 (+221), मृत 34,657 (+23)
  10. इराण – कोरोनाबाधित 2,07,525 (+2,573), मृत 9,742 (+119)
  11. जर्मनी – कोरोनाबाधित 1,92,119 (+544), मृत 8,969 (+7)
  12. टर्की – कोरोनाबाधित 1,88,897 (+1,212), मृत 4,974 (+24)
  13. पाकिस्तान – कोरोनाबाधित 1,81,088 (+4,471), मृत 3,590 (+89)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 1,80,545 (+5,343), मृत 21,825 (+1,044)
  15. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,61,005 (+3,393) मृत 1,307 (+40)
  16. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,60,750 (+373), मृत 29,663 (+23)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 1,15,786 (+3,480), मृत 1,502 (+38)
  18. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,01,637 (+300), मृत 8,436 (+6)
  19. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 1,01,590 (+4,288), मृत 1,991 (+61)
  20. कतार – कोरोनाबाधित 88,403 (+1,034), मृत 99 (+1)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.