Pimple Gurav News : हॉटेलमध्ये हुक्का पार्लर, हॉटेल चालक आणि म‌ॅनेजरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून दिल्याबद्दल पिंपळे गुरव येथील हॉटेल चालक आणि म‌ॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इग्नाईट रेस्ट्रो अॅन्ड लाऊंज येथे सोमवारी (दि.14) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली आहे.

हॉटेल चालक प्रसन्न शिवानंद पडेसुर (वय 27, रा. काशिद पार्क, पिंपळे गुरव) आणि हॉटेल मॅनेजर व्यंकटरमन्नीया सुबय्या बोम्मनबोईना (वय 34, रा. जवळकर नगर, पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसन्न याचे पिंपळे गुरव येथे इग्नाईट रेस्ट्रो अॅन्ड लाऊंज हे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून दिला. सामाजिक सुरक्षा पथकाला याबाबत माहिती मिळाल्यावर सोमवारी हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत 15 वेगवेगळे तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट, इतर साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 41 हजार 850 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.