Chakan Crime News : एचयूएफ इंडीया कंपनीची व्यवस्थापकीय संचालकाकडून 139 कोटी रूपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एचयूएफ इंडीया प्रा. लि. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कंपनीची तब्बल 139 कोटी रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चार संचालकांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एचयूएफ इंडीया प्रा. लि, नाणेकरवाडी, चाकण येथे 2010 के मे 2020 या कालावधीत हा प्रकार घडला.

सुनिल कुमार गर्ग, निखिल अगरवाल, संदीप वाणी, विशाल टमोटीया अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. संदीप जगदीश चौधरी (वय 45, रा. नाणेकरवाडी, चाकण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यवस्थापकीय संचालक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून, खोट्या पर्चेस ऑर्डर स्विकारल्या तसेच कंपनीचे खोटे शिक्के तयार केले व माल कंपनीत न घेता त्याच्या खोट्या नोंदी केल्या आणि व्हेंडरला पैसे दिले. वेगवेगळ्या एनजीओंना आवश्यकता नसताना पैसे दिले, असे गैरव्यव्हार करून कंपनीची 139 कोटी रूपयांची फसवणूक केली असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.