23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Pune Crime News : जातीवाचक शिवीगाळ व आर्थिक फसवणूक प्रकरणी एकाविरुध्द गुन्हा

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – चिंबळी आणि भोसरीमध्ये एकाला जातीवाचक शिवीगाळ आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आळंदी पोलीस ठाण्यात एकाविरुध्द (Pune Crime News)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pavna River : पवना नदीत वेस्ट चिकन, मटन टाकण्यासाठी आलेल्या एकाला रंगेहाथ पकडले; गुन्हा दाखल

 

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की – चिंबळी (ता. खेड) येथील प्रविण इंडस्ट्रीज ही कंपनी विकत देतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास मिळविला. मात्र ती कंपनी फिर्यादी यांना न देता अन्य एकाला विकून फिर्यादी यांची फसवणूक केली. याबाबत अभिजित कांबळे (वय 42, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.या प्रकरणी संदीप सर्फळे (वय 40, रा. भोसरी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

संदीप सर्फळे याने 2021 पासून फिर्यादी अभिजित कांबळे (Pune Crime News)   यांना कंपनी देतो असे सांगून ती परस्पर दुसरीकडे दिली. त्यानंतर 27 मे 2022 रोजी पैसे देत नसल्याने फिर्यादीने सर्फळे याला फोन केला. सर्फळे याने कांबळे यांना भोसरीमध्ये बोलविले. त्यावेळी कांबळे, त्यांचा भाऊ व त्यांचा मित्र प्रणव काळोखे गेले असता सर्फळे याला व्यवहाराचे ठरलेल्या रक्कमेचे पैसे व मागील व्यवहाराचे पैसे 13.17 लाख रुपये मागितले.मात्र ते देण्यास आरोपीने नकार दिला. मात्र कांबळे यांनी त्याला विनंती केल्यावरही ते न देता जातीवाचक शिवीगाळ केली.

spot_img
Latest news
Related news