Social Network : सोशल मीडियावर बदनामी केली तर 5 वर्षे शिक्षा, या राज्याने केलाय कायदा

एमपीसी न्यूज : सोशल मीडियावरून एखाद्याची बदनामी करणे किंवा अन्य माध्यमातून अपमानजनक साहित्य प्रकाशित करणाऱया विरोधात केरळ राज्याने कठोर कायदा पास केला आहे. यात आरोप सिद्ध झाल्यास दहा हजार रूपये दंड किंवा 5 वर्षांची शिक्षा किंवा दोन्हींचा समावेश करण्यात आला आहे.

केरळचे राज्यपाल आरीफत मोहम्मद खान यांनी शनिवारी केरळ पोलीस अॅक्टमध्ये बदल करणाऱया या कायद्याच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. या कायद्याप्रमाणे सोशल मिडियावर तसेच अन्य माध्यमातून अपमानजनक वा मानहानी करणारे साहित्य प्रकाशित करणाऱयावर दहा हजार रूपये दंड आणि 5 वर्षांचा कारावास किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. संविधानाचे भान राखून या कायद्याचा वापर मिडीया किंवा सरकारवर टीका करणाऱयांविरोधात करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे.

अभिव्यक्ति स्वातंत्र्य वा निष्पक्ष पत्रकारितेच्या विरोधात या कायद्याचा अजिबात वापर केला जाणार नसल्याचे विजयन यांनी म्हटले आहे. वैयक्तिक पसंत किंवा नापसंत, राजकीय किंवा गैर राजकीय हित, पुटुंबियांचे शांतीपूर्ण वातावरण खराब करणे, कोणाविरोधात दुश्मनी काढणे यासारखे हल्ले पत्रकारितेच्या व्याख्येत बसत नाहीत. ही तर बदला घेण्याची कारवाई आहे. तसेच अनेक वेळा पैशाच्या आमिषाने अशी घृणास्पद पृत्ये केली जातात असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.