Dehugaon : कोरोनासारख्या महामारीत रुग्णसेवा करणारे डॉक्टर हेच सध्याचे देव : बबनराव भेगडे

एमपीसी न्यूज : सध्या डॉक्टर कोरोनासारख्या महामारीत देखील लोकसेवा करीत आहेत. त्यामुळे तेच आज देव असून, त्यांच्या मागे समाजाने भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले.

देहूगाव येथे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी कॉग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने परिसरातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा कवच, मास्क व पीपीई कीटचे वाटप व कोवीड 19 सुरक्षा रक्षक क्लिनीकचे उदघाटन मावळ तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

मावळ तालुका ग्रामीण ब्लॉक सेलचे अध्यक्ष सुभाष जाधव, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती हेमलता काळोखे, सरपंच पुनम काळोखे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष अभिमन्यू काळोखे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष योगेश मोरे, राष्ट्रवादी कॉग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र येळवंडे, डॉ. संदीप सांडभोर, डॉ. सुहास जोशी, डॉ. अनिल लेंडे, डॉ. संतोष गादे, डॉ. लोहार, डॉ. बोराडे, माजी सदस्य संदीप शिंदे, ज्ञानेश्वर काळोखे, अशोक मराठे आदी उपस्थित होते.

डॉक्टर सेलच्या वतीने हा उपक्रम मावळ तालुक्यात राबविण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून सर्व राज्यातील सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायिकांना सुरक्षा कवच म्हणून फेस शिल्ड, एन 95 मास्क व पीपीई कीट यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यभरात या कीटचे वितरण करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.