Dehuroad : आरएमसी वाहनाची तलाठ्याच्या कारला धडक

एमपीसी न्यूज – आरएमसी वाहनाने मावळ तालुक्यातील एका तलाठ्याच्या कारला धडक दिली. सुदैवाने या घटनेत तलाठी सुखरूप आहेत. ही घटना बुधवारी (दि. 3) देहूरोड जवळ पुणे मुंबई जुन्या महामार्गावर घडली.
याबाबत माहिती अशी की, कान्हे गावचे तलाठी रवी मेहरुत हे जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून कारणे जात होते देहूरोड येथील सेंट्रल चौकाच्या पुढे तळेगावच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारला पाठीमागून आरएमसी वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली. यामध्ये मेहरुत यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कार मधील सर्व एअर बॅग उघडल्याने ते बचावले.

या अपघातामुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.