Pimpri-chinchwad : भरधाव डंपरची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

Bebedohol Accident
एमपीसी न्यूज : –  काल  (दि. 2 एप्रिल) रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बिकानेर स्वीट होम चौक, भोसरी येथे एका दुचाकीस्वाराचा  भरधाव डंपरने (Pimpri-chinchwad) दिलेल्या धडकेमुळे जागीच मृत्यू झाला.

 

Chikhali : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश रघुनाथ भावसार  (वय 42 रा. वाकड) यांचा भाऊ मयूर रघुनाथ भावसार  (वय 41 रा. पिंपळे सौदागर) हे त्यांच्या दुचाकीवरून भोसरी येथून जात असताना बिकानेर स्वीट होम चौक येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिली.  या धडकेत मयूर  भावसार दुचाकीवरून (Pimpri-chinchwad) खाली पडले व त्यांच्या अंगावरून  डंपर गेल्यामुळे ते मृत्यू पावले.  भोसरी पोलिसांनी सोनाजी बबन मोहिते ( वय 27 रा. लोणीकंद )  डंपर चालकाला  याप्रकरणी अटक केली आहे.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share