Dehuroad : महिना एक लाख रुपये देतो सांगून तीन लाखांना लुटले

एमपीसी न्यूज – महिना एक लाख रुपयांचा परतावा देतो म्हणत देहूरोड (Dehuroad) येथील एका महिलेला तब्बल तीन लाखांना लुबाडले आहे. हा प्रकार 16 एप्रिल ते 9 ऑगस्ट या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.9) तक्रार दिली असून साक्षी, नेहा व कृष्णा (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sahitya Amrit Granthotsav : महापालिकेतर्फे 13 ते 21 ऑगस्ट दरम्यान ‘साहित्य अमृत ग्रंथोत्सव’ व्याख्यानमाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी ते मुंबई येथील सीएपीएसटीओएनई या कंपनीचे एक्जीक्युटीव आहेत अशी बतावणी केली. तुम्हाला महिना एक लाख रुपये मिळवून देतो म्हणून फिर्यादी यांचे पती कोमल प्रभाकर जाधव (वय 41, रा.देहूरोड) यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी एकूण 3 लाख रुपये काढून घेतले. मात्र, कोणताही परतावा न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. यावरून देहूरोड (Dehuroad) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याचा पुढिल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.