Akurdi News : आकुर्डी भागातील पावसाळी गटर साफ करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – आकुर्डी परिसरातील संपूर्ण परिसर हा दाट लोकवस्तीचा आहे. या भागात चाळीचे प्रमाण जास्त असून बैठी घरे जास्त आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या भागातील पावसाळी गटर (स्टॉर्म वॉटर लाईन) साफ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस इखलास सय्यद यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत सह शहर अभियंता, अ क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य समन्वयक अधिकारी श्रीकांत सवणे यांना निवेदन दिले आहे. त्यात सय्यद यांनी म्हटले आहे की, आकुर्डी परिसरातील संपूर्ण परिसर हा दाट लोकवस्तीचा आहे. या भागात चाळीचे प्रमाण जास्त असून बैठी घरे जास्त आहेत. पावसाळ्यात पाणी साचून बऱ्याच नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचे प्रमाण वाढते.

यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व पावसाळी गटर साफ करून घ्यावी. जुना प्रभाग 14 मध्ये संपूर्ण टेलको कपूर सोसायटी, नितीन कुटे चाळ, दत्तवाडी विलास लॉनड्री, दत्तवाडी जैन मंदिर ते साई अपार्टमेंट,रुपाली लॉन्ड्री ते आदर्श मित्र मंडळ, उपकार चेंबर्स ते साई आपर्टमेंट पर्यंत दत्तमंदिर मागील परिसर,रुपेश कॉलनी,राम नरसिंग होम ते कोयना मार्केट, सरस्वती शाळा परिसर, सूर्यवंशी चौक ते सुर्वे गिरणी, क्रांतीनगर परिसर, श्री विठ्ठल मंदिर समोरील भाग, मल्हार पॅलेस,इंद्रायणी पॅलेस ते सोनिगरा क्लासिक पर्यंतची स्टॉर्म वॉटर लाईन, गणेश कामगार मंडळ ते सोनिगरा क्लासिक पर्यंत यासह आकुर्डी गाव, पंचतारानगर, गुरुदेव नगर, पांढरकरवस्ती, गंगानागर भागातील सर्व पावसाळी गटर आणि स्टॉर्म वॉटर लाईन पावसाळ्यापूर्वी तातडीने साफ करून घ्याव्यात अशी मागणी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.