Devendra Fadnavis : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोना

एमपीसी न्यूज : सध्या कोरोनाची साथ पुन्हा पसरताना दिसत आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हंटले आहे, की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे आणि उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांना कोविड चाचण्या करून घ्याव्यात. सर्वांनी काळजी घ्या!

Vaccination : शहरातील 8 केंद्रांवर सोमवारी होणार लसीकरण

 देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोना लागण झाली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल 4 जून रोजी लातूर दौऱ्यावर होते. त्यांनी लातूर जिल्ह्यातील औसा येथील  शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.  तसेच अनेक लोकांसमोर आपले भाषण देखील केले. आणि आज त्यांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीला देवेंद्र फडणवीस कसे उपस्थित राहणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आज ते सोलापूर दौरा करणार होते. परंतु, त्यांना ताप आल्याने त्यांनी यूटर्न घेतला आणि तात्काळ होम आयसोलेशन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.