Dilip Kumar : दिलीप कुमार यांना भारतरत्न मिळावा – सायरा बानो

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar)  यांना मृत्यूनंतर भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कारान गौरविण्यात आले आहे. दिवंगत दिलीप कुमार यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी हा पुरस्कार स्विकारला. दिलीप कुमार यांच्यावतीने हा पुरस्कार स्विकारताना सायरा बानो यांना अश्रू अनावर झाले.

Maharashtra News : राज्यात नवीन 23 संवर्धन राखीव, 5 अभयारण्ये

दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना मिळालेला भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला.तसेच एक मोठे वक्तव्य केले आहे, त्या म्हणाल्या की, दिलीप कुमार यांना भारतरत्न या पुरस्कारान सन्मानित करायला हवे, अशी मागणी सरकारला केली आहे.

 

 

 

दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना जाहिर झालेला भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दिलीप कुमार यांचे स्मरण करताना सायरा बानो यांना आश्रू अनावर झाले होते. सायरा बानो यांनी या पुरस्कार सोहळ्यात म्हणाल्या की, दिलीप साहेबांचे नाव निघाल की मी रडू आवरु शकत नाही म्हणून मी कोणत्याही कार्यक्रमांना हजर रहात नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.