Pune News : आई-वडिलांच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद, भावाने बहिणीला पेटवले

एमपीसी न्यूज : आई-वडिलांच्या निधनानंतर बहीण भावात संपत्तीवरून वाद झाल्यानंतर सख्या भावाने बहिणीला पेटविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात बहीण जखमी झाली आहे. 

याप्रकरणी शरद मोहन पतंगे (45, रा. यशोधन सोसायटी बिबवेवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत राजश्री मनोहर पतंगे (48, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद व राजश्री हे सख्खे भाऊ बहीण आहेत. दोघांचा वडिलोपार्जित संपतीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी आई वडिलांचे निधन झाले आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी शरद हा दारू पिऊन राजश्री यांच्या घरी आला.

त्यावेळी राजश्री या घरात खुर्चीवर आराम करत होत्या. त्यांच्यात पुन्हा संपत्तीतून वाद सुरू झाला. यादरम्यान त्याने त्याच्या जवळील काडेपेटीतील काडीने आग लावून बहिणीला पेटून दिले. यात राजश्री या जखमी झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.