Maval News : भोयरे गावात महिला बचत गटांना स्टेशनरी किटचे वाटप

एमपीसी न्यूज – हॅण्ड इन हॅण्ड इंडिया तळेगाव (दाभाडे) संस्थेमार्फत भोयरे गावात एकूण 14 महिला बचत गटांना स्टेशनरी साहित्य किट वाटप करण्यात आले. बचत गटाच्या रेकॉर्डमधे अचूकता व पारदर्शता दाखवत विविध व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

त्यामधे गणयंत्र(calculator), स्टेपलर, खोडरबर, पेनपॅक, पट्टी, व्हाइटनर, शॉपणर gluestic, व इंक pad इत्यादी रेकॉर्डसाठी आवश्यक 11 वस्तूचे वाटप करण्यात आले.

या सर्व साहित्यांचा वापर करून महिलांनी बचत गटाच्या रेकॉर्डमधे कशी अचूकता व पारदर्शता आणता येईल व संस्थेने स्थापन केलेल्या शिवशक्ती ग्रामसंघाच्या (C.L.N ) माध्यमातून महिलांनी केलेल्या बचतीतून गावात जास्तीत जास्त व्यवसाय कसे करता येईल याविषयी सारिका शिंदे मॅडम ह्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी गावातील गावचे विद्यमान सरपंच बळीराम भोईरकर, ग्रामसेविका प्रमिला सुळके व हॅण्ड इन हॅण्ड संस्थेच्या वतीने अभिजित अब्दुले, सारिका शिंदे, गौरी करवंदे व पंढरीनाथ बालगुडे हे उपस्थित होते.गावातील सर्व महिला बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव व गटातील सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.