Chikhali News : जागतिक परिचारिका दिनानिमित्त डॉक्टर आणि परिचारिकांचा सत्कार

एमपीसी न्यूज – जागतिक परीचारिका दिना निमित्त म्हेत्रे वस्ती येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दवाखान्यातील परीचारिकांचा पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन कोरोना काळामध्ये दवाखान्यातील परीचारिका व कर्मचारी आणि डॉ रामनाथ बच्छाव यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी प्राधिकरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश सोमैय्या, वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त श्रीराम नलावडे, अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख, ग्रंथ दिंडी प्रवर्तक विश्वास पेंडसे, प्रदीप तासगांवकर (अध्यक्ष अंनिस निगडी) व वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्टचे पुणे विभागाचे प्रकाश सातव उपस्थित होते.

डॉ रामनाथ बच्छाव यांनी मिलिंद देशमुख यांच्या विश्व विक्रमाला 29  वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने त्यांचा हाॅस्पिटल तर्फे सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.