Pimpri News : कोरोनाला लाईटली घेऊ नका, नियम पाळा

आयुक्त राजेश पाटील यांचा नागरिकांशी संवाद

एमपीसी न्यूज – विलगीकरणात असलेल्यांनी नियम पाळावेत. त्या रुग्णांनी नियम न पाळल्याने देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिक गृह विलगीकरणातून उठून थेट बाहेर पडतात. तिथे कोणतीही काळजी घेत नाहीत. काहीजण कोरोनाला खूप लाईटली घेत आहेत. नागरिकांनी असे करू नये. असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

आयुक्त राजेश पाटील यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्व गोष्टींचे आकलन करून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मास्क आणि सनीटायझर वापरावं. कोरोना साथीची परिस्थिती सध्या गंभीर आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर बेड मिळणेही अवघड होणार आहे. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून नियम पाळण्याची जबाबदारी नागरिकांनी पार पाडावी.

सुपर स्प्रेडर (वाहन चालक, शिक्षक, कर्मचारी, दुकानदार, सुरक्षा रक्षक आणि ज्या नागरिकांचा अनेक नागरिकांशी कामानिमित्त संपर्क येतो असे नागरिक) यांचे लसीकरण प्राधान्याने करणार. लसीकरण केंद्रावरून घरी जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या आजूबाजूला 45 वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्यांना लसीकरणासाठी आणावे. लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावं. त्यांचे लसीकरण करण्यासाठी मदत करावी.

कोरोना बाबत तरुणांचा दृष्टीकोन खूप वेगळा आहे. मला काहीच होत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करा. काहीही त्रास होत नाही म्हणून दुर्लक्ष करू नका. त्याचा इतरांना मोठा तोटा होऊ शकतो. सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत लसीकरण केले जात असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.