Pune News : मुलगा सांभाळत नसल्याची 80 वर्षीय महिलेची तक्रार, त्यानंतर पोलिसांनी केले असे काही की…

एमपीसी न्यूज : मुलगा सांभाळ करत नसल्याची तक्रार एका 80 वर्षीय महिलेने पुणे पोलिसांच्या भरोसा सेल पथकाकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी या मुलाला पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षात बोलावून घेतले. पोलिसांच्या भाषेतच त्याला समज दिली.

ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत काय कारवाई होऊ शकते हे त्याला सांगितले आणि या महिलेच्या नावावर असलेला आणि मुलाने कब्जा केलेला एक फ्लॅट, दहा तोळे सोन्याचे दागिने आणि सहा लाख रुपये मुलीचे कागदपत्रे या महिलेला मिळवून दिले.

पुणे पोलीस आयुक्तालय भरोसा सेल अंतर्गत ज्येष्ठ नागरिक कक्ष कार्यरत आहे. या कक्षामार्फत ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या विविध समस्यांचे तत्काळ निवारण करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी  1090 हा  टोल फ्री क्रमांक 24 तास चालू असतो.

कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांच्या काय समस्या आहेत हे पाहण्यासाठी दररोज चार ते पाच ठिकाणी भेटी देण्याचा उपक्रम या कक्षामार्फत सुरू आहे. अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 240 ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेटी दिल्या आहेत. या कक्षामार्फत आतापर्यंत हेल्पलाईन द्वारे आलेल्या 529 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

या कक्षामार्फत ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुले आणि इतर नातेवाईकांकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रास तसेच आर्थिक फसवणूक, मालमत्तेवरून होणार्‍या त्रासा विरुद्धच्या तक्रारीचे निवारण केले जाते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.