Duke’s Nose : दिल्लीचा अभियंता हरवला लोणावळ्यात; पोलिसांची शोधमोहीम सुरू

एमपीसी न्यूज : लोणावळ्यामध्ये ड्यूक्स नोज  (Duke’s Nose) येथे सहलीला गेलेला दिल्लीस्थित पर्यटक शुक्रवारी  दुपारपासून जंगलात बेपत्ता झाल्याची बातमी समोर येत आहे. 

बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव इरफान शाह (वय 24) आहे. तो अभियंता असून दिल्ली येथे वास्तव्यास आहे. त्याने आपल्या भावाला फोन करून जंगलात ट्रेनच्या रुळावरून उतरल्याची माहिती दिली.

त्यानंतर काही तासांनी त्याचा फोन बंद झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने तो हरवल्याची तक्रार दाखल केली.

लोणावळा ग्रामीण पोलीस आणि शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक या युवकाचा जंगलात शोध घेत आहेत. पोलिसांना त्याच्या भावाने या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ड्यूक पॉइंटच्या परिसरात त्याचा शोध घेण्यासाठी समर्पित पथके तयार करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदुर्ग स्वयंसेवकांव्यतिरिक्त, खोपोलीमधील यशवंत हायकर्सचे सदस्यही पोलिसांना मदत करत आहेत.

ते ड्रोनच्या सहाय्याने परिसर स्कॅन करत आहेत.  पोलिसांसोबत बचाव पथकातील पन्नास सामाजिक स्वयंसेवक शोध मोहिमेत जुंपले आहेत.

Sambhaji Maharaj Jayanti : चक्क एका दिवसात किशोरवयीन मुलांनी अनवाणी पायाने केले ५ किल्ले सर

लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सीताराम डुबल यांनी सांगितले की, ”बेपत्ता तरुण काही शासकीय कामासाठी कोल्हापुरात आला होता. तो रोबोट बनवणाऱ्या कंपनीत काम करतो.

तो पुणे आणि कोल्हापूर येथे एक दिवस थांबला, त्याला गिर्यारोहणाची आवड असल्याने त्याने नंतर लोणावळ्यातील ड्यूक पॉईंटला (Duke’s Nose ) भेट दिली.

भावाला फोन करून त्याने रस्ता चुकल्याची (Duke’s Nose) माहिती दिली.

तो एकटाच प्रवास करत होता. याआधीही ड्यूक पॉइंटच्या ठिकाणाहून अनेक लोक बेपत्ता झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.