Pimple Nilakh Crime News : रिक्षातून प्रवासादरम्यान महिलेची बॅग हिसकावली, 33 हजार रुपयांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – रिक्षातून प्रवासादरम्यान दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेची बॅग हिसकावली. बॅग मध्ये मोबाईल, एटीएम, सोन्याची चैन, रोख रक्कम, परवाना असा 33 हजार रूपयांचे साहित्य होते. न्यु डी.पी. रोड पिंपळे निलख येथे गुरूवारी (दि.13) ही घटना घडली.

याबाबत महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 392, 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या सहकारी महिलेसोबत रिक्षामधून प्रवास करीत होत्या. रिक्षा न्यु डी.पी. रोड पिंपळे निलख येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी महिलेची बॅग हिसकावली. त्या बॅगमध्ये बॅग मध्ये मोबाईल, एटीएम, सोन्याची चैन, रोक रक्कम, परवाना असा 33 हजार रुपयांचे साहित्य होते. असे फिर्यादीत म्हटले आहे. सागंवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.