Talawade Crime News : लॉक करून पार्क केलेली रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज – लॉक करून पार्क केलेली रिक्षा चोरीला गेली आहे. आयकॉन हॉस्पिटलच्या मागे टॉवरलाईन, तळवडे येथे 13 ते 14 एप्रिल 2022 दरम्यान ही घटना घडली.

प्रमोद हरिषचंद्र पोरनाक (वय 26, रा. त्रिवेणीनगर, आयकॉन हॉस्पिटलच्या मागे टॉवरलाईन, तळवडे) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची एमएच 14 जीसा 3403 ही रिक्षा लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही 75 हजार रूपये किंमतीची रिक्षा चोरी केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.